Homeताज्या बातम्याAsaduddin Owaisi: मुंबईवर हल्ला करणारे आमचे भाऊ कसे? पाकिस्तान प्रेमाचे फुगे ओवेसींनी...

Asaduddin Owaisi: मुंबईवर हल्ला करणारे आमचे भाऊ कसे? पाकिस्तान प्रेमाचे फुगे ओवेसींनी झटक्यात फोडले…

Times of India Desk, Pune: भारतातील राजकारणात आपल्या तिखट विधानांसाठी ओळखले जाणारे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी परदेशात जाऊन पाकिस्तानची चांगलीच धुलाई केली आहे. नेहमी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडणाऱ्या ओवेसींनी यावेळी मात्र एका पाकिस्तानी तरुणाला असे सडेतोड उत्तर दिले की, उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. “पाकिस्तानी मुस्लिम तुमचे भाऊ आहेत का?” या प्रश्नावर ओवेसींनी दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर आगीसारखे पसरले आहे.

नेमकं घडलं काय ?

अमेरिकेतील शिकागो येथे एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी संवाद साधत होते. यावेळी प्रेक्षकांमधील एका पाकिस्तानी तरुणाने त्यांना विचारले, “ओवेसी साहेब, पाकिस्तानी मुस्लिम तुमचे भाऊ आहेत, असे तुम्ही मानता का?”

हा प्रश्न ऐकताच ओवेसींनी आपल्या नेहमीच्या शैलीत पण अत्यंत कठोर शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले,
“कोण भाऊ? कसले भाऊ? ज्या देशातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला, १६० हून अधिक निरपराधांचा जीव घेतला, कसाबसारखे नराधम जिथे तयार होतात, त्या देशातील लोक आमचे भाऊ कसे असू शकतात?”

आम्ही जिनांना लाथाडले आहे

ओवेसी यांनी यावेळी इतिहासाचा दाखला देत सांगितले की, “भारतातील मुस्लिमांनी फाळणीच्या वेळीच मोहंमद अली जिना यांच्या द्विराष्ट्रवादाला नाकारले होते. आमचे पूर्वज पाकिस्तानात गेले नाहीत, त्यांनी भारत हीच आपली मातृभूमी मानली. त्यामुळे पाकिस्तानशी आमचे नाते जोडू नका. तो एक अयशस्वी देश आहे.”

पाकिस्तानला आरसा दाखवला

आपल्या भाषणात ओवेसींनी पाकिस्तानच्या सध्याच्या दयनीय अवस्थेवरही बोट ठेवले. ते म्हणाले, “पाकिस्तानचे नेते म्हणजे जोकर्स आहेत. त्यांना देश चालवता येत नाही आणि ते भारताशी बरोबरी करायला जातात.” पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत विषयात नाक खुपसू नये,” असा सज्जड दमही त्यांनी भरला.

व्हिडिओ का होतोय व्हायरल?

साधारणपणे भारतात ओवेसींवर देशविरोधी किंवा पाकिस्तानधार्जिणे असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र, अमेरिकेच्या भूमीवर उभे राहून ओवेसींनी ज्या प्रकारे पाकिस्तानला सुनावले, ते पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!