Homeताज्या बातम्यावॉर्ड 173 मध्ये भाजप–शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने; ‘50 खोके’ घोषणांनी वातावरण तापले

वॉर्ड 173 मध्ये भाजप–शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने; ‘50 खोके’ घोषणांनी वातावरण तापले

Times of Maharashtra Desk: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यानंतर आता मुंबईतही भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यातील अंतर्गत वितुष्ट उघडपणे समोर आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शुक्रवारी भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते थेट आमनेसामने आल्याची घटना घडली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.वॉर्ड 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत सुरु आहे. आज सकाळी प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी जमल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी माईकवरून ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्याने वातावरण चांगलेच तापले.

आतापर्यंत ठाकरे गटाकडून या घोषणांचा वापर शिंदे गटावर टीका करण्यासाठी होत होता. मात्र, मित्रपक्षातील भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच अशा घोषणा दिल्या गेल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनीही भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले. हा सगळा प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना घडलेल्या या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.दरम्यान, शिवसेना-भाजप जागावाटपात वॉर्ड क्रमांक 173 शिंदे सेनेला सुटला होता. त्यानुसार शिवसेनेने पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनी भाजपचा कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे त्यांचा अर्ज वैध ठरल्याने शिंदे गटाला नाईलाजाने या वॉर्डमध्ये मैत्रीपूर्ण लढतीला सामोरे जावे लागले. प्रचार सुरू होताच ही ‘दोस्तीतली कुस्ती’ उघडपणे समोर आली आहे.

या प्रकरणावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपचे कोण महारथी आहेत ते पाहावे लागेल. अशा घोषणा देण्याआधी देवेंद्र फडणवीस यांना विचारावे. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात. या प्रकाराची फडणवीस यांनी दखल घ्यावी,” अशी मागणी शिरसाट यांनी केली. दरम्यान, भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे सेनेचे वरिष्ठ नेते या वादावर काय तोडगा काढतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

error: Content is protected !!