Times of Maharashtra Desk : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाकडून गफूर पठाण हे यंदाची महापालिका निवडणूक लढवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे, जमिनीवर काम करणारे नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. प्रभागातील वाढती ट्रॅफिक समस्या, अपुरी पाणीपुरवठा व्यवस्था, रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून ते ही निवडणूक लढवत आहेत. “नागरिकांना ट्रॅफिकमधून मुक्त करणे आणि प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा पोहोचवणे” हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे.
प्रचारादरम्यान गफूर पठाण यांचा थेट नागरिकांशी संवाद, त्यांच्या समस्या ऐकून घेण्याची पद्धत आणि तातडीने उपाययोजना करण्याची भूमिका नागरिकांच्या मनाला भावत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला सर्वसामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.






















