Homeताज्या बातम्यादौंड नगरपालिकेच्या हद्दीतील विरंगुळा केंद्रात अनधिकृत काम सुरू?

दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील विरंगुळा केंद्रात अनधिकृत काम सुरू?

संघराज गायकवाड, राहुल आढाव ( दौंड प्रतिनिधी ) :  नगरपालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र या कामासंदर्भात कोणताही अधिकृत कामाचा फलक, मंजुरी आदेश, संबंधित विभागाची माहिती किंवा निधी कोणत्या योजनेतून उपलब्ध झाला आहे, याबाबतची कोणतीही माहिती घटनास्थळी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे हे काम अधिकृत आहे की अनधिकृत, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संभ्रम आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.

कामाचा फलकच नाही, माहिती पूर्णपणे गायब

नगरपालिका हद्दीत सुरू होणाऱ्या कोणत्याही विकासकामासाठी नियमाप्रमाणे कामाचा फलक लावणे, मंजुरीचा आदेश, कामाचा अंदाजपत्रक, निधीचा स्त्रोत व संबंधित अधिकाऱ्यांची नावे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असते. मात्र सदर विरंगुळा केंद्र परिसरात सुरू असलेल्या खोदकामाबाबत अशी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

झाडे व पर्यावरण धोक्यात

सदर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे असून, त्याठिकाणी सुरू असलेल्या खोदकामामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. झाडांच्या मुळांना इजा होण्याची शक्यता असून, भविष्यात ही झाडे कोसळण्याचा धोका देखील नाकारता येत नाही. पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

जागेच्या मालकी हक्कावर प्रश्नचिन्ह

ही जागा नेमकी शासनाच्या मालकीची आहे की खासगी मालकी हक्काची, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच तथाकथित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र खरोखर सार्वजनिक स्वरूपाचे आहे की खासगी उपक्रमासाठी वापरले जात आहे, यावरही संशय व्यक्त केला जात आहे. जर ही जागा शासकीय असेल, तर त्यावर कोणाच्या आदेशाने व कोणत्या अधिकाराने काम सुरू करण्यात आले, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

निधी व आदेश कोणाचे?

या कामासाठी निधी कोण देणार आहे, कोणत्या योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे, तसेच कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशाने हे काम सुरू झाले आहे, याबाबतही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे कामामागे नेमका उद्देश काय, हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष?

विशेष म्हणजे, याच प्रभागातील अनेक भागांमध्ये आजही रस्त्यांची दयनीय अवस्था, बंद अवस्थेतील रोड लाईट, अनियमित पाणीपुरवठा अशा मूलभूत समस्या कायम आहेत. अत्यावश्यक विकासकामे प्रलंबित असताना, केवळ काही ठराविक ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि त्यातही शासकीय जागेवर अशा प्रकारचे काम कोणाच्या सांगण्यावरून व इतक्या घाईने का सुरू करण्यात आले, असा थेट सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

चौकशीची मागणी

सदर प्रकरणी दौंड नगरपालिकेने तातडीने हस्तक्षेप करावा, या कामाची वैधता तपासावी, कामास मंजुरी आहे की नाही, निधीचा स्त्रोत कोणता आहे, जागेचा मालकी हक्क कोणाचा आहे आणि संबंधित जबाबदार अधिकारी कोण आहेत, याची सविस्तर व लेखी माहिती नागरिकांसमोर मांडावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

जर हे काम अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले, तर तात्काळ काम थांबवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!