Homeक्राईमपहूरमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; प्रेमसंबंधातून वाद वाढून जिवंत जाळल्याचा आरोप

पहूरमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; प्रेमसंबंधातून वाद वाढून जिवंत जाळल्याचा आरोप

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील पहूर तालुक्यात पळासखेडा देवस्थान परिसरातील जंगलात एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातील वादातून तरुणीची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिस भरती प्रशिक्षण घेत असलेल्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

मृत तरुणीचे नाव आकांक्षा उर्फ अजय हेमराज गडे (मूळ रा. छत्तीसगड) असे असून ती सध्या सुरत येथे वास्तव्यास होती. या गुन्ह्यात स्वप्निल उर्फ गोलू अशोक पाटील (वय २३, रा. पहूर, ता. जामनेर) याला पहूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी २०२४ पासून पोलिस भरतीची तयारी करत असून नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीजवळ तो राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नाशिकमध्ये ओळख, पुढे प्रेमसंबंध

पोलिस तपासानुसार, काही महिन्यांपूर्वी नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीजवळील एका नाश्ता गाडीवर आरोपी स्वप्निल आणि आकांक्षा यांची ओळख झाली. मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, काही कालावधीनंतर आकांक्षा ही तृतीयपंथीय असल्याचे समजल्यावर तसेच लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. आरोपीने हे नाते तोडण्याचा आग्रह धरला होता, मात्र आकांक्षा यासाठी तयार नव्हती.

भेटीच्या बहाण्याने जंगलात नेले

शनिवारी, ३१ जानेवारी रोजी आरोपीने आकांक्षाला भेटण्यासाठी पहूर तालुक्यात बोलावले. दोघे एकत्र आल्यानंतर त्यांनी एका दुकानातून मद्य खरेदी केले. या मद्य खरेदीचे ऑनलाईन पेमेंट आकांक्षाने केले होते. पुढे तपासादरम्यान हेच ऑनलाईन पेमेंट पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरले.

यानंतर दोघे पळासखेडा देवस्थान परिसरात गेले. देवदर्शन झाल्यानंतर आरोपीने आकांक्षाला जवळच्या जंगलात नेले. तेथे दोघांमध्ये पुन्हा एकदा तीव्र वाद झाला.

काठीने हल्ला, गळा दाबून हत्या

वादाच्या भरात आरोपी स्वप्निलने आकांक्षावर काठीने जोरदार हल्ला केला. आकांक्षा खाली कोसळल्यानंतर आरोपीने तिचा गळा दाबून तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्या केल्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने आकांक्षाच्या दुचाकीच्या डिकीतून पेट्रोलची बाटली काढली, मृतदेहावर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिले. मृतदेह पूर्णपणे जळाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

तांत्रिक पुराव्यांमुळे गुन्ह्याची उकल

घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जळालेल्या मृतदेहाची ओळख पटविणे मोठे आव्हान होते. मात्र मृत तरुणीच्या पायातील नेलपॉलिश, नाकातील मुगळी, परिसरातील मद्यविक्री दुकानातील सीसीटीव्ही फुटेज, ऑनलाईन पेमेंट रेकॉर्ड (कॅशफ्री) तसेच मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मृत तरुणीची ओळख पटवली.

या सर्व पुराव्यांच्या आधारे संशयाची सुई स्वप्निल पाटीलकडे वळली. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस पथकाचे विशेष कौतुक

या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकरवाड, उपनिरीक्षक सोपान गोरे, पीएसआय शरद बागल, जितेंद्र वलटे, अंमलदार ईश्वर पाटील, तसेच पहूर पोलिस स्टेशनचे अंमलदार विनोद सुभाष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

पुढील तपास सुरू

या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पहूर पोलीस करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानीत

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) : तालुक्यातील म्हसवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना दर्शक महोत्सवानिमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली (तासगांव) यांच्यावतीने राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्कार...

दौंडमध्ये भीम महोत्सवात ४२ रक्तदात्यांचे रक्तदान; आंबेडकर-फुले जयंतीनिमित्त मानवंदना

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) :  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दौंड येथे  भीम महोत्सव २०२६ ...

पुण्याच्या डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांची ISAR च्या 16व्या अध्यक्षपदी नियुक्ती; भारतातील फलनक्षमता उपचार क्षेत्राला...

0
Times Of Maharashtra Desk : आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त फलनक्षमता तज्ज्ञ आणि रुबी हॉल आयव्हीएफ एंडोस्कोपी सेंटरच्या प्रमुख डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांनी आता इंडियन...

सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

0
Times Of Maharashtra Desk पुणे : सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका २७ वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत....

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

error: Content is protected !!