Homeमहाराष्ट्रब्रह्मपुरी–उमरखेड बससेवा बंद; प्रवाशांचा संताप, आंदोलनाचा इशारा

ब्रह्मपुरी–उमरखेड बससेवा बंद; प्रवाशांचा संताप, आंदोलनाचा इशारा

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी ते उमरखेड दरम्यान धावणारी एसटी बससेवा मागील पंधरा ते वीस दिवसांपासून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशी सेवा असोसिएशन, ब्रह्मपुरी शाखेच्या वतीने बससेवा पूर्ववत सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

उमरखेड, पुसद, दारव्हा, वणी आणि यवतमाळ या मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महिला, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बससेवा अत्यंत महत्त्वाची होती. मात्र सध्या या मार्गावर ब्रह्मपुरी आगाराची एकही बस नसल्यामुळे प्रवाशांना पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत असून, त्यात वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत.

प्रवाशी सेवा असोसिएशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डांगे यांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन देऊन ही सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मागील तीन ते चार वर्षांपासून ही बससेवा नियमित सुरू होती. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ब्रह्मपुरी आगारालाही या मार्गावरून चांगले उत्पन्न मिळत होते.

मात्र अचानक ही सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत प्रशांत डांगे यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर बससेवा पूर्ववत सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदन देताना राहुल भोयर, अमरदीप लोखंडे, शरद भानारकर, रमाकांत अरगेलवार यांसह इतर सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!