Homeउद्योगसेंद्रिय शेतीचा नवा मंत्र: गेगावमध्ये शेती शाळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण

सेंद्रिय शेतीचा नवा मंत्र: गेगावमध्ये शेती शाळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण

Times Of Maharashtra Desk : गेगाव (ता. शहापूर,) येथे विठ्ठल मंदिर परिसरात दुसरी शेती शाळा मोठ्या उत्साहात आणि शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. या कार्यक्रमाला गावातील शेतकरी, कृषीप्रेमी, महिला शेतकरी तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या शेती शाळेचा आजचा मुख्य विषय बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धती व त्यांचा शेतीतील प्रभावी वापर हा होता. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेता या विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमादरम्यान तज्ञांनी बीज प्रक्रिया करण्यासाठी बीजामृत तयार करण्याची पद्धत सविस्तर समजावून सांगितली. तसेच जमिनीतील सूक्ष्मजीवांची वाढ करून सुपीकता वाढविण्यासाठी जीवामृत व घनजीवामृत कसे उपयुक्त ठरते यावर मार्गदर्शन केले. पिकांवरील किड व रोग नियंत्रणासाठी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क तयार करण्याच्या सोप्या व घरच्या घरी करता येणाऱ्या पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

या नैसर्गिक उपाययोजनांमुळे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते, तसेच मातीची गुणवत्ता सुधारते आणि शेती अधिक शाश्वत बनते, असे तज्ञांनी स्पष्ट केले. उपस्थित शेतकऱ्यांनीही या पद्धतींबाबत उत्सुकता दर्शवत विविध प्रश्न विचारले.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले तसेच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना या संकल्पना अधिक स्पष्टपणे समजल्या. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात या पद्धतींचा अवलंब करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या शेती शाळेचे आयोजन माऊली युवा शेतकरी गट, गेगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, युवा शेतकरी व कृषी मित्र हर्षल डोंगरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावात सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत होत आहे.

गावातील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, भविष्यातही अशा प्रकारच्या शेती शाळांचे आयोजन करावे, अशी मागणी व्यक्त करण्यात आली. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबतच पारंपरिक ज्ञानाचा संगम साधता येऊन शेती अधिक प्रगत व फायदेशीर होण्यास मदत होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशात आणखी एक मानाचा तुरा तिघांची मुंबई पोलीस दलात...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्वभरती प्रशिक्षण केंद्राच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला...

निफाड तालुक्यात ‘गुरव पॅटर्न’ची जोरदार चर्चा चांगल्या लोकांसाठी मदतीचा हात गुन्हेगारांसाठी कायद्याचा कठोर बडगा!

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले) : निफाड तालुक्यात सध्या पोलीस निरीक्षक श्री. गणेशजी गुरव यांच्या कार्यशैलीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष...

गेवराईतील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे यांचे दुःखद निधन; परिसरात हळहळ

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील भगवान नगर येथील ज्येष्ठ नागरिक श्रीरंगराव काकडे (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झाले....

नाशिकमध्ये विधान परिषदेसाठी गिरीश महाजनांचे कट्टर समर्थक आमने-सामने; निशेश बोरा विरुद्ध गणेश गिते संघर्ष,...

0
नाशिक जिल्हा ,निफाड तालुका (प्रतिनिधी योगेश कर्डिले ,उत्तम जाधव ) : नाशिक, 29 मे 2026: विधान परिषद नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन...

जीव गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? ससाणेनगर कॅनाल पुलाच्या रखडलेल्या कामावर पै. उल्हास तुपे...

0
हडपसर (प्रतिनिधि धीरज महानगरे):  प्रशासन फक्त पत्रे आणि सूचना फलक लावून जबाबदारी झटकत असल्याचा राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष पै. उल्हास भाऊ तुपे यांचा...

error: Content is protected !!