Homeताज्या बातम्यागोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात 'आधार' आणि 'सेतू' केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना खिरापत

Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी आधार सेवा केंद्र आणि ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (सेतू) वाटपात गंभीर अनियमितता केल्याचा प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकारातून (RTI) प्राप्त झालेल्या कागदपत्रांमुळे जिल्हा प्रशासनातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असून, यात मोठ्या आर्थिक उलाढालीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही माहिती इम्रान कुरेशी यांनी दिली आहे.

SOP आणि शासन नियमांकडे दुर्लक्ष
शासनाच्या नियमानुसार, आधार किट वाटपासाठी विशिष्ट ‘मानक कार्यप्रणाली’ (SOP) निश्चित केलेली आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात ४१ नवीन आधार किटचे वाटप करताना या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली. आर्थिक वर्षात किमान ५०० ट्रान्झॅक्शनची अट असताना, ती पूर्ण न करणाऱ्या आणि आधार ऑपरेटर प्रमाणपत्र नसलेल्या व्यक्तींनाही संगनमताने किट देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

घोटाळ्याचे मुख्य मुद्दे :
१. पारदर्शकतेचा अभाव: आधार किट वाटपाची प्रक्रिया जिल्हाधिकारी पोर्टल किंवा कोणत्याही सार्वजनिक माध्यमावर प्रसिद्ध न करता छुप्या पद्धतीने राबवण्यात आली.

२. एकाच कुटुंबात अनेक केंद्रे: नियमानुसार एका कुटुंबात एकच केंद्र देणे बंधनकारक असताना, अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांना अनेक केंद्रे वाटप करण्यात आली आहेत.

३. खाजगी लोकेशन्सवर केंद्रे: अनेक आधार केंद्रे कोणत्याही शासकीय एनओसी (NOC) शिवाय खाजगी जागेत सुरू आहेत, जे नियमांचे थेट उल्लंघन आहे.

४. कागदपत्रांची हेराफेरी: काही केंद्रांवर पोर्टलवर नाव एकाचे आणि मोबाईल नंबर-ईमेल दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे आढळले आहे. तसेच आर्थिक वर्षाच्या तारखांमध्ये फेरफार करून अपात्रांना पात्र ठरवण्यात आले.

५. शासकीय कर्मचाऱ्यांचेही हात ओले: विशेष म्हणजे, काही ठिकाणी चक्क शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावावरही केंद्रे सुरू असल्याचे RTI मधून स्पष्ट झाले आहे.

अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी आणि महा-IT च्या विशिष्ट कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. विभागीय आयुक्त, नागपूर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊन तीन महिने उलटले तरी, स्थानिक स्तरावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, तक्रारदाराला बदनाम करून बातम्या दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप इम्रान कुरेशी यांनी केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी प्रजीत नायर त्यांचे देखील हात ओले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाग 1

क्रमशः

लवकरच आणखीन एक मोठा घोटाळा येणार समोर…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

error: Content is protected !!