Homeताज्या बातम्याShivaji Maharaj Farmers Loan Waiver शेतकरी कर्जमाफीचा खेळखंडोबा? आठ वर्षांनंतरही 6.56 लाख...

Shivaji Maharaj Farmers Loan Waiver शेतकरी कर्जमाफीचा खेळखंडोबा? आठ वर्षांनंतरही 6.56 लाख शेतकरी प्रतीक्षेत…

Times of Maharashtra Desk: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (2017) अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना गेल्या आठ वर्षांपासून कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याचे धक्कादायक वास्तव विधानसभेतील चर्चेत समोर आले आहे. एकूण 6 लाख 56 हजार शेतकरी अजूनही लाभाच्या प्रतीक्षेत असून, या योजनेच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी 5,975.51 कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, पुरवणी मागण्यांमध्ये केवळ 500 कोटींचीच तरतूद करण्यात आल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लेखी उत्तरात मान्य केले.यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची थट्टा केली जात आहे का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीत अब्जावधी रक्कम; शेतकऱ्यांना फक्त 75 हजारांची मदत

ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल 1 अब्ज रुपये जमा झाले होते. मात्र राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75 हजार रुपयांचीच मदत मिळाल्याचे आरटीआयमधून उघड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांनी मिळवलेल्या माहितीनुसार साखर कारखान्यांना प्रति टन ऊस मागे 10 रुपये निधीला देण्याचे सरकारचे फर्मान असूनही मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही.

355 कोटी 55 लाखांची मदत तिजोरीतच अडकली

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 31,628 कोटींच्या मदत पॅकेजमधून अनेकांना लाभ मिळालेला नाही. ई-केवायसी पूर्ण नसणे, आधार-बँक माहितीतील तफावत आणि पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे 5 लाख 42 हजार 141 शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यांच्यासाठी निर्धारित 355 कोटी 55 लाखांची रक्कम सरकारी तिजोरीतच अडकून राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीत टीकांची धार तीक्ष्ण

हि बाब समोर येताच अंगार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. उज्वला थिटे यांनीही राजन पाटील यांच्या कुटुंबावर “कितीवेळा आनंद साजरा करणार?” असा सवाल उपस्थित करत टीकेची झोड उठवली आहे.राज्यातील शेतकरी प्रश्न, निधी अडथळे आणि अपुऱ्या तरतुदींवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीत हे मुद्दे प्रमुख ठरणार असून निवडणुकींवर यांचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!