Homeताज्या बातम्याधाराशिवमध्ये थरारक निकाल; ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाचा अवघ्या एका मताने विजय,...

धाराशिवमध्ये थरारक निकाल; ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाचा अवघ्या एका मताने विजय, जवळा गटात धनंजय सावंत विजयी

Times Of Maharashtra Desk : धाराशिव राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना धाराशिव जिल्ह्यातील निकालांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषतः ढोकी पंचायत समितीतील एका मताने झालेल्या विजयाने निवडणूक इतिहासात नोंद घेण्यासारखा क्षण निर्माण झाला आहे.

ढोकी पंचायत समिती मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे यांनी भाजपच्या निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. अमर समुद्रे यांना ३,१८७ मते, तर निहाल काझी यांना ३,१८६ मते मिळाली. एका मताच्या फरकामुळे अखेरपर्यंत निकालावर सस्पेन्स कायम राहिला होता.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत दोन्ही उमेदवारांमध्ये मतांची तफावत अत्यंत कमी होती. शेवटची फेरी पूर्ण होईपर्यंत कोण बाजी मारणार याबाबत अनिश्चितता होती. अखेर निकाल जाहीर होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत हा विजय साजरा केला. या थरारक लढतीने धाराशिव जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.

दरम्यान, परंडा तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातही अत्यंत महत्त्वपूर्ण लढत पाहायला मिळाली. माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी २,१८७ मतांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे धनंजय सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना भाजपचा पाठिंबा होता.

जवळा गटाची लढत ही जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेतील लढतींपैकी एक ठरली. भूम-परंडा-वाशी हा मतदारसंघ माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी जोरदार प्रचार केला होता.

या गटात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या देखील निवडणूक रिंगणात होत्या. त्यामुळे ही लढत केवळ स्थानिकच नव्हे, तर जिल्हा पातळीवरील प्रतिष्ठेची मानली जात होती.

ढोकीतील एका मताचा थरार आणि जवळा गटातील बंडखोरीतून मिळालेला विजय या दोन्ही निकालांनी धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले असून, आगामी स्थानिक राजकारणावर या निकालांचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!