Homeताज्या बातम्याकोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत धक्कादायक निकाल; विश्वास पाटील यांचा पराभव, डोंगळे डोंगळे...

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत धक्कादायक निकाल; विश्वास पाटील यांचा पराभव, डोंगळे डोंगळे विजयी

Times Of Maharashtra Desk : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांना मोठा झटका बसला आहे. पाडळी खुर्द मतदारसंघातून त्यांचा चिरंजीव सचिन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजू सूर्यवंशी यांनी दारुण पराभव केला. विशेष म्हणजे विश्वास पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांना देखील धक्का बसला होता. मात्र, पक्षांतरानंतरही जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना यश मिळालेले नाही, त्यामुळे पक्षांतराचे फायदे कितपत रुचले, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

दुसरीकडे, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या मुलीने विजय मिळवला. अमृता डोंगळे यांनी कसबा तारळे मतदारसंघातून विजयी होऊन कुटुंबाला दुहेरी भावनिक अनुभव दिला आहे. विश्वास पाटील यांना मुलाच्या पराभवाचा आणि डोंगळे कुटुंबाला मुलीच्या विजयाचा अनुभव एकाचवेळी सामोरे जावा लागला.

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. कागल तालुक्यात संजय मंडलिक गटाचे पानिपत झाले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे यांनी सर्व जागा सहज पटकावल्या आहेत. करवीर तालुक्यातील लक्षवेधी पाचगाव मतदारसंघात काँग्रेसच्या संग्राम पाटील यांना विजय मिळाला, तर उचगाव मतदारसंघात भाजपच्या नामदेव वाईंगडे यांना विजयी झाले. गोकुळ शिरगावमधून काँग्रेसच्या सूदर्शन खोत यांचा विजयही महत्त्वाचा ठरला आहे.

दरम्यान, भर निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना झटका देत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, शीतल फराकटे यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे आणि त्यांचा पराभव राष्ट्रवादीच्या शोभाताई फराकटे यांनी केला.

या निकालांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे. पक्षांतर, पूर्वीच्या लोकप्रियतेवर आधारित मत आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव यांच्यातील फरक या निकालातून स्पष्टपणे दिसून आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!