Homeमहत्त्वाचे१६ मेपासून डिजिटल घरगणना; ३४ प्रश्नांद्वारे होणार माहिती संकलन

१६ मेपासून डिजिटल घरगणना; ३४ प्रश्नांद्वारे होणार माहिती संकलन

गेवराई (प्रतिनिधी – विष्णु गायकवाड):
देशातील सर्वात मोठी लोकसंख्या मोजणी प्रक्रिया असलेल्या जनगणनेला यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, तब्बल २०११ नंतर प्रथमच ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा १६ मे ते १५ जूनदरम्यान पार पडणार आहे.

या पहिल्या टप्प्यात ‘घरगणना’ करण्यात येणार असून, प्रगणक घराघरात जाऊन मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती संकलित करणार आहेत. यामध्ये कागद-पेनचा वापर टाळून थेट डिजिटल नोंदणीवर भर दिला जाणार आहे. घराची रचना, मालकी हक्क, पाणी व वीज सुविधा, स्वच्छतागृह, इंटरनेट तसेच उपलब्ध वाहनांची माहिती नोंदवली जाणार आहे.

यावेळच्या जनगणनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे पेपरलेस असणार आहे. संकलित झालेला डेटा तत्काळ ‘सीएमएमएस’ पोर्टलवर अपलोड केला जाणार असल्याने पारदर्शकता वाढेल आणि मानवी त्रुटी कमी होऊन प्रक्रिया अधिक जलद होणार आहे.

निवासी नसलेल्या जागांसाठी (दुकान, गोदाम आदी) फक्त २ ते ३ प्रश्नांद्वारे माहिती नोंदवली जाणार आहे. जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून, अॅप वापर, माहिती संकलन आणि पूर्वतयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

ही जनगणना दोन टप्प्यांत होणार असून, दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची सविस्तर माहिती घेतली जाईल. प्रशासनाने नागरिकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

३४ प्रश्नांमध्ये घराचे स्वरूप (कच्चे/पक्के, स्वतःचे/भाड्याचे), पाणी-वीज सुविधा, स्वच्छतागृह, इंटरनेट, वाहने, टीव्ही, लॅपटॉप तसेच घरातील सदस्यांची संख्या याबाबत माहिती विचारली जाणार आहे. ही जनगणना देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!