Homeदेश-विदेशकोलकात्यात ED ची I-PAC वर छापेमारी; ममता बॅनर्जींनी साधला थेट सामना, भाजपचा...

कोलकात्यात ED ची I-PAC वर छापेमारी; ममता बॅनर्जींनी साधला थेट सामना, भाजपचा पलटवार

Times of Maharashtra Desk: कोळसा घोटाळा प्रकरणी प्रवर्तन निदेशालयाने (ED) गुरुवारी कोलकात्यातील राजकीय सल्लागार संस्था I-PAC (इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी) च्या कार्यालयावर छापेमारी केली. याच प्रकरणात I-PACचे प्रमुख प्रशांत (प्रतीक) जैन यांच्या निवासस्थानीही EDने धाड टाकली. या कारवाईदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः I-PACच्या कार्यालयात पोहोचल्या, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले.

गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यावरूनच ही कारवाई – ममता बॅनर्जी   

ED च्या छापेमारीदरम्यान ममता बॅनर्जी कार्यालयातून काही फाइल्स हातात घेऊन बाहेर आल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
ममता म्हणाल्या, ED आणि गृहमंत्री अमित शाह यांचे काम काय? राजकीय पक्षांची हार्ड डिस्क आणि मतदार यादी जप्त करणे? देशाची सुरक्षा सांभाळण्यात अपयशी ठरणारे हे अतिशय घटिया आणि शरारती गृहमंत्री आहेत. आमच्यावर दबाव आणण्यासाठीच ही कारवाई मुद्दाम केली जात आहे. EDने केवळ I-PACच नव्हे, तर तृणमूल काँग्रेसच्या (TMC) IT सेलवरही छापेमारी केल्याचे समोर आले आहे.यावर ममता म्हणाल्य “ED माझ्या पक्षाशी संबंधित सर्व कागदपत्रे उचलून नेत आहे. मी जर भाजपच्या कार्यालयावर छापा टाकला तर काय होईल? SIRच्या माध्यमातून बंगालमध्ये मतदारांची नावे काढून टाकली जात आहेत. निवडणुकांच्या नावाखाली माझ्या पक्षाची सगळी माहिती गोळा केली जात आहे.

भाजपचा जोरदार पलटवार
ममता बॅनर्जींच्या आरोपांनंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले,“ममता बॅनर्जी संविधानाचे उल्लंघन करत आहेत. त्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामात अडथळा आणत आहेत. जर ममता यांच्या घरावर छापा पडला, तर किमान 100 कोटी रुपये सापडतील.

ममतांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी
शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
ते पुढे म्हणाले,आज ममता यांनी जे केले, ते थेट तपासात अडथळा आणण्यासारखे आहे. I-PACच्या कार्यालयात मतदार यादी का होती? I-PAC हे पक्षाचे कार्यालय आहे का? ममता कुठेही, कधीही छापेमारी करून दाखवोत. कोलकात्यातील या घडामोडींमुळे कोळसा घोटाळा प्रकरणासह केंद्र–राज्य संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, येत्या काळात या प्रकरणावर राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

error: Content is protected !!