Homeक्राईमFaltan Doctor Death : फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाचे खुलासे; फॉरेन्सिक रिपोर्टमधून...

Faltan Doctor Death : फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाचे खुलासे; फॉरेन्सिक रिपोर्टमधून आत्महत्येची पुष्टी : देवेंद्र फडणवीस

Times of Maharashtra Desk: विधनसभेत मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळा दाबून झाला नसून तिने गळफास घेतल्यामुळेच मृत्यू झाला असल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीस म्हणाले की, फॉरेन्सिक अहवालात दोन महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पहिली म्हणजे तरुणीच्या हातावर लिहिलेला मजकूर तिच्याच हस्ताक्षरात आहे. दुसरे म्हणजे तिचा मृत्यू हा गळफासामुळेच झाला आहे. त्यामुळे गळा दाबून हत्या झाल्याचा अंदाज निराधार ठरतो.

गोपाळ बदनेवर गंभीर आरोप
या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी गोपाळ बदने याने डॉक्टर तरुणीची फसवणूक करून तिचे शारीरिक शोषण केल्याचे मोबाईल चॅटमधून स्पष्ट झाले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. बदनेने लग्नाचे आमिष दाखवीत तरुणीचे शारीरिक शोषण केले, मात्र नंतर आपल्या भूमिकेत बदल केला.तसेच, आणखी एका तरुणानेही तिची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. यामुळे तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये या दोघांची नावे नमूद केली होती. “दोघांकडून झालेल्या फसवणुकीमुळे तिने अत्यंत नैराश्येत जाऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला,” असे फडणवीस म्हणाले.या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला असून लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पोलिसांच्या दबावाचा आत्महत्येशी संबंध नाही
डॉक्टर तरुणी फलटण उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होती. आरोपींच्या मेडिकल फिटनेस अहवालासंदर्भात काही महिन्यांपूर्वी तिच्या वरिष्ठांना पोलिसांनी पत्र लिहले होते. काही आरोपींना “अनफिट” प्रमाणपत्र देण्यात आल्याने ही पत्रव्यवहाराची प्रक्रिया सुरू झाली होती.फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “हा सर्व प्रकार पाच महिने आधी घडला होता आणि त्याचा तरुणीच्या आत्महत्येशी कोणताही संबंध नाही.” पोलिसांकडून दबाव आणल्याचा दावा निराधार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाच्या चौकशीचा अंतिम टप्पा सुरू असून सरकारकडून पारदर्शक आणि निष्पक्ष तपास केला जाईल, अशी हमी फडणवीस यांनी सभागृहात दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी.

0
देऊगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 3 जून 2026 रोजी भगवान बाबा चौक चिखली रोड देऊळगाव राजा येथे सर्व धर्मीय व स्मारक समिती ग्रुप...

error: Content is protected !!