Homeताज्या बातम्याLadki Bahin Yojana: विधानसभा हिवाळी अधिवेशन 2025 : "प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...

Ladki Bahin Yojana: विधानसभा हिवाळी अधिवेशन 2025 : “प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका,” मुख्यमंत्री फडणवीसांचा अभिमन्यू पवारांना सार्वजनिक इशारा

Times of Maharashtra Desk: महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयामुळे सतत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महिला कल्याणाशी संबंधित अनेक मुद्दे सभागृहात उपस्थित झाल्यावर ही योजना वारंवार चर्चेत येत . मंगळवारी झालेल्या हिवाळी अधिवेशनातही अशीच परिस्थिती निर्माण झाली; मात्र या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा अनावश्यक उल्लेख होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

भाजप आमदार आणि मुख्यमंत्री यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पवार म्हणाले, “अवैध दारू ही आमच्या लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या आहे. महिला सतत याबाबत तक्रारी करत असतात. त्यामुळे यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, विधानसभा अध्यक्षांनी यापूर्वी संबंधित विभागांना निर्देश दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस काहीसे चिडल्याचे दिसून आले. त्यांनी थेट पवारांना सुनावले, “प्रत्येक मुद्दा लाडकी बहीण योजनेशी जोडू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाण्यासारखी कोणतीही भाषा वापरू नका; अन्यथा घरी बसावे लागेल.” फडणवीस यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, तिच्या निधीत कोणताही बदल होणार नाही आणि तिची तुलना इतर कोणत्याही योजनेशी करता येणार नाही.तसेच, मुख्यमंत्री म्हणाले की विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या निर्देशांची अंमलबजावणी झाली नसेल तर ती आता तातडीने केली जाईल. सरकार महिला सुरक्षेबाबत, तसेच अवैध दारूविरोधात ठोस पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!