Homeताज्या बातम्यामनपा आरोग्य विभागात निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह? ‘फोन कॉल’ की पात्रता? १३६व्या क्रमांकावरील...

मनपा आरोग्य विभागात निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह? ‘फोन कॉल’ की पात्रता? १३६व्या क्रमांकावरील आरोग्य निरीक्षकाच्या बढतीवर वादाची ठिणगी आता विभागात उफाळली नाराजी!

आता विभागात उफाळली नाराजी..!

मनपा प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर कर्मचाऱ्यांचे थेट प्रश्न

Times of Maharashtra Desk पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात दोन महिन्यांपूर्वी समोर आलेल्या जेष्ठतेला बगल देणाऱ्या आदेशाचा वाद आता अधिक चिघळला आहे. १३६व्या क्रमांकावरील आरोग्य निरीक्षकास वरिष्ठ पदाचा पूर्णवेळ पदभार देण्यात आल्याच्या प्रकारानंतर, विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सरळ प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात १३५ अधिकारी पुढे असताना त्यांना वगळून खालच्या क्रमांकावरील अधिकाऱ्याची निवड करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी “ही निवड कशी आणि कोणत्या निकषांवर?” हा मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. बदलीनंतर फक्त दोन महिन्यांतच पुन्हा जवळपास त्याच भागात पुनर्नियुक्ती तेही वरिष्ठ पदावर हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संशयास्पद असल्याचे मत विभागात दबक्या आवाजात मांडले जात आहे.

कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, विभागातील जेष्ठता, पारदर्शकता आणि नियुक्तीचे नियम जर कागदावरच पडून राहणार असतील, तर मेहनतीने केलेल्या सेवेला अर्थ उरणार नाही. काही कर्मचाऱ्यांनी तर स्पष्टपणे सांगितले की, “ज्येष्ठतेचा आदर नसेल, तर आम्ही दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या जेष्ठता यादीचा उपयोग काय?”

दरम्यान, आदेश “प्रभारी” असल्याची तोंडी माहिती दिल्यानंतरही, अधिकृत कागदात मात्र “पूर्णवेळ वरिष्ठ पदभार” असे नमूद असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तोंडी काही आणि लिखित काही या दोन भिन्न भूमिका प्रशासनाच्या विश्वासार्हतेला धक्का देणाऱ्या ठरत असल्याचे त्यांचे मत आहे.

युनियननेही या ग्राम्य वाटणार्‍या विसंगतीवर नाराजी व्यक्त केली आहे. युनियनचे अध्यक्ष उदय भट यांनी हा निर्णय जेष्ठतेच्या तत्वाला धक्का देणारा असल्याचे सांगत आयुक्तांकडे लिखित तक्रार देण्याची तयारी दर्शवली आहे.
“१३५ अधिकारी कमी पात्र होते की त्यांच्या नावामागे कोणते ‘फोन कॉल’ नव्हते?” असा थेट सवाल कर्मचाऱ्यांतून मोठ्या प्रमाणात उमटतो आहे.

दरम्यान, या घटनेने संपूर्ण विभागात ‘सिस्टम कोणासाठी?’ हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोग्य विभागासारख्या अत्यंत महत्त्वाच्या शाखेमध्येही जर नियुक्त्या अस्पष्ट, वेगाने आणि निवडक पद्धतीने होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांत रुजली, तर मनपाच्या प्रशासकीय विश्वसनीयतेवर मोठा परिणाम होईल, अशी भीती दाखवली जात आहे.

पदभरावातील अस्पष्टता, वेतन-स्थलांतील विसंगती आणि जेष्ठता दुर्लक्ष केल्याची तक्रार—या सर्वांचा मिलाफ पाहता हा विषय आता विभागापुरता मर्यादित न राहता प्रशासनिक पारदर्शकतेच्या केंद्रस्थानी येऊन ठेपला आहे.पुणेकरांना स्वच्छतेचा आदर्श देणाऱ्या विभागातच जर निर्णयांचा गोंधळ असेल, तर नागरिकांच्या मनात निर्माण होणारे प्रश्‍न टाळणे प्रशासनाला आता अवघड जाणार हे स्पष्ट आहे.

नवनाथ शेलार काय म्हणाले?

मी जबाबदारीने काम करतो म्हणून मला ह्या पदावर बसवण्यात आहे आहे.
बाकीचे आरोग्य निरीक्षक सकाळी 9 वाजता येतात आणि 2 वाजता निघून जातात. त्यामुळे त्यांना हे पद मिळाले नाही. त्यामुळे ते सर्व माझ्यावर जळत आहेत.

पुढच्या बातमीत लवकरच आरोग्य खात्यातील एका अधिकाऱ्याकडे 9 खाते देण्यात आले ते कसे यावर सखोल बातमी टाईम्स ऑफ महाराष्ट्र करणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!