Homeक्राईमPune Crime News : पुण्यातील सय्यदनगर हादरले! हॉटेल व्यवसायिकावर 8 जणांचा प्राणघातक...

Pune Crime News : पुण्यातील सय्यदनगर हादरले! हॉटेल व्यवसायिकावर 8 जणांचा प्राणघातक हल्ला…

Times of Maharashtra Desk, Pune : पुण्यातील सय्यदनगर परिसरात 26 ऑक्टोबर रोजी रात्री 8 च्या सुमारास हॉटेल व्यवसायिकावर 8 जणांनी एकत्रितपणे प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्र आणि लाकडी काठ्यांनी केलेल्या या हल्ल्यात व्यवसायिक गंभीर जखमी झाला असून काळेपडळ पोलिस ठाण्यात 27 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हुसैन मुसर्रका कादरी (वय ३९, रा. हांडेवाडी रोड, पुणे) हे हॉटेल आणि फळ विक्रीचा व्यवसाय करतात. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास ते सय्यदनगर येथील गल्ली क्रमांक १ मध्ये असताना अमजद अफजल शेख, अकबर अफजल शेख, आयान अमजद शेख,
मुद्दसर सलीम शेख, मजहर काजी, अशपाक अफजल शेख, जावेद बागवान व इतर अनोळखी इसम
सर्व रा. सय्यद नगर महंमदवाडी पुणे त्यांच्या साथीदारांनी एकत्र येऊन त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी धारदार लोखंडी शस्त्र व लाकडी काठ्यांचा वापर करून कादरी यांना मारहाण केली.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत कादरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी जुने कलम IPC ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ३४२ व नवीन कलम BNS कलम १०९, ११८(२), ११५(२) १८९(२), (४), १९१ (२) (३), १९०, ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे. यामध्ये एक आरोपी अटक आहे. तर बाकीचे आरोपी आणखीन फरार आहे.

या घटनेचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विलास सुतार करत आहेत. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना केले असून घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेमध्ये असलेल्या आरोपींपैकी काहींवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी काही संघटना व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!