Homeक्राईमएकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी फरार

एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी फरार

Times Of Maharashtra Desk : फोनवर बोलण्यास नकार दिला आणि मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील तपनेश्वर भागात घडली. या हल्ल्यात गायत्री तुषार सावंत (वय २६) गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री सावंत (तपनेश्वर गल्ली, जामखेड) ही नृत्यांगना असून ती मैत्रीण मनिषा प्रकाश जावळे हिच्यासोबत राहत होती. आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) याच्याशी तिची मागील पाच वर्षांपासून ओळख होती. मात्र २०२४ पासून दोघांमधील संबंध तुटले होते. यापूर्वीही पीडितेने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

धमकीनंतर पहाटे केला हल्ला

गुरुवार, दि.५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता आरोपीने गायत्रीला फोन करून तू माझ्याशी बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस तर तुला मारून टाकीनअशी धमकी दिली होती. त्यानंतर तिने त्याचा फोन कट केला.यानंतर शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजता आरोपी इमारतीजवळ दबा धरून बसला होता. त्या वेळी गायत्री सावंत तिच्या खोलीत मैत्रीण मनिषासोबत होती. मनिषा बाल्कनीत गेल्याची संधी साधून आरोपीने हातात कोयता घेऊन खोलीत प्रवेश केला आणि गायत्रीच्या बोटांवर, हातावर तसेच डोक्यावर वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली.

आरोपी फरार; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

हल्ल्यानंतर मनिषा जावळे हिने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने शिवीगाळ करत घटनास्थळावरून पळ काढला.या प्रकरणी गायत्री सावंत हिने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात राहुल कचरे याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!