Homeक्राईमकॉण्ट्रॅक्ट किलिंगचा कट? राम सातपुते यांचा धैर्यशील व अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर...

कॉण्ट्रॅक्ट किलिंगचा कट? राम सातपुते यांचा धैर्यशील व अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर थेट आरोप

Times Of Maharashtra Desk : भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या हत्येचा कट रचण्यात आला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या कटामागे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड असू शकतात, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना आधीच मिळाल्याने गेल्या तीन दिवसांपासून माळशिरस तालुक्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.

माध्यमांशी बोलताना राम सातपुते म्हणाले की, निवडणूक काळातच गुप्तचर यंत्रणा आणि जिल्हा पोलिसांना संशयास्पद माहिती मिळाली होती. बाहेरच्या टोळीमार्फत कॉन्ट्रॅक्ट किलिंग करण्याचा कट असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आपण लेखी माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. पोलिसांकडून संशयितांचे आर्थिक व्यवहार, बँक डिटेल्स तपासले जात असून तपास वेगाने सुरू आहे.

राम सातपुते यांनी स्पष्ट केले की, आपण संविधानिक मार्गाने राजकारण करणारा नेता असून धमकीची व ठोकशाहीची भाषा दुर्दैवी आहे. भविष्यात माझ्या जीवाला काही झाले, तर यासंबंधीची माहिती मी वरिष्ठ पातळीवर दिली आहे. पुढील सत्य पोलिस तपासातून समोर येईल, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या हे सर्व आरोप तपासाधीन असून अंतिम निष्कर्ष पोलिस चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!