Homeताज्या बातम्या“Maharashtra Municipal Elections Results Postponed “महाराष्ट्र नगरपालिका निवडणुका : निकाल २१ डिसेंबरपर्यंत...

“Maharashtra Municipal Elections Results Postponed “महाराष्ट्र नगरपालिका निवडणुका : निकाल २१ डिसेंबरपर्यंत पुढे, आचारसंहितेची मुदत वाढवली”

Times of Maharashtra Desk : महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांबाबत एक महत्त्वाचा निर्णय समोर आला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी पुढे ढकलण्यासोबतच आचारसंहितेची अंमलबजावणीची मुदतही वाढवली आहे. न्यायालयाने राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले असून यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल झालेला आहे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. काही नगरपरिषदांच्या खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणी प्रलंबित असल्याने राज्यातील सुमारे २० नगरपरिषदांचे मतदान पुढे ढकलण्यात आले होते.

आता या निवडणुका २० डिसेंबर रोजी होतील.याचिकेत सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर करावेत अशी मागणी करण्यात आली होती, अन्यथा २० नगरपरिषदांच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज झालेल्या सर्व नगरपालिका निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश दिले. आधी हे निकल ३ डिसेंबर रोजी लागणार होते ते आता पुढे ढकळून २१ डिसेंबर रोजी लागणार आहेत.

२० डिसेंबर रोजी निवडणुका संपल्यानंतर अर्धा तास एक्झिट पोल जाहीर करता येतील. २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिताही लागू राहील. ज्या ठिकाणी निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत, तिथे उमेदवारांना पूर्वी दिलेली निवडणूक चिन्हे अबाधित राहतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!