Homeमहाराष्ट्रम्हसवडमध्ये पाणीटंचाई तीव्र; प्रा. बाबर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे

म्हसवडमध्ये पाणीटंचाई तीव्र; प्रा. बाबर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे

म्हसवड प्रतिनिधी महेश कांबळे : माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या म्हसवड येथे पालिकेच्या ढिसाळ व तोकड्या नियोजनामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना तब्बल ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

प्रा. बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची गरज वाढलेली असताना पाणीपुरवठा अत्यल्प आणि अनियमित होत आहे. शहरातील अनेक भागांना ७ ते ८ दिवसांनीच पाणी मिळत असून, पुरवठ्याचा कालावधीही विस्कळीत होत आहे. जुन्या पाईपलाईनमधील गळतीमुळेही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

म्हसवड शहरासाठी सुमारे ८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांपूर्वी मंजूर झाली असली तरी काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. उपलाइनचे काम बहुतांश पूर्ण झाले असले तरी मुख्य पाईपलाईन अपूर्ण आहे. तसेच काही ठिकाणी तांत्रिक त्रुटींमुळे पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

ठेकेदाराची मनमानी व अयोग्य व्यवस्थापनामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. केवळ खर्चाची बिले काढण्यापेक्षा जनतेचे हित महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जुन्या योजनेसोबतच नवीन नळ पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी प्रा. बाबर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!