Times of Maharashtra Desk: राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी म्हणजेच आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये जोरदार धावपळ पाहायला मिळाली. मुंबई, पुणे, ठाणे, लातूरसह इतर महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी राजकीय रंगभूमी हायव्होल्टेज बनली होती. उमेदवार आता 2 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेऊ शकतात. मतदान 15 जानेवारीला होईल, तर 16 जानेवारीला सर्व 29 महानगरपालिकांमध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
मुंबईत शेवटच्या दिवशी बंडखोरीला उधाण
मुंबई महानगरपालिकेत या निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. शेवटच्या दिवशी सर्व पक्षांच्या उमेदवारांची प्रचंड धावपळ पाहायला मिळाली. शिवसेना, भाजप, काँग्रेस, मनसे, ठाकरे गटाने अनेक उमेदवारांना एबी फॉर्म वितरित केले तथापि, उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी बंडखोरीला सुरुवात केली. मुंबईत ठाकरे गटाचे सूर्यकांत कोळी, प्रीती पाटणकर, चंद्रशेखर वायंगणकर, अनिल कोकीळ यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा मार्ग स्वकरला. भाजपमध्ये वॉर्ड क्रमांक 200 मध्ये गजेंद्र धुमाळ आणि संजय दास्ताने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. गोरेगावमध्ये भाजपचे विधानसभा महामंत्री संदीप जाधव यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मुलुंडमध्ये विधानसभा महामंत्री प्रकाश मोटे आणि कमलाकर दळवी यांनीही पक्ष सोडला. शिंदे गटाने शेवटपर्यंत उमेदवारांची यादी लपवून ठेवली. तर काही उमेदवारांनी एब फॉर्म न मिळाल्या मुळे थेट टोकाचे पाऊल उचल्याच्या घटना देखील आज दिवसभरात समोर आल्या. काहीना रडू आले तर काहीनी आत्मदहणाचे प्रकार केले. एकंदरीत आज दिवसभरात सर्व पक्षात सवळगोंधल पाहायला मिळाला. जागावाटपाचा तिढा सुटायला उशीर झाल्याने अनेक इच्छुकांची गोची झाली. तर महायुती असो वा महाविकास आघाडी, शेवटपर्यंत कोणत्या जागा कोणाकडे जाणार हे स्पष्ट नसल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक ठिकाणी एकाच जागेवर अनेक इच्छुकांना आशा लावून धरली. यामुळे कार्यकर्त्यांची निष्ठा पणाला लागली, पण शेवटच्या क्षणी अनेकांच्या पदरी निराशा पडली. शेवटच्या क्षणी नाव कापले गेल्यामुळे अनेक सक्षम उमेदवारांना दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा अपक्ष म्हणून तयारी करण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही.
शिवसेना-भाजप युतीत उडाला गोंधळ
पुण्यात शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजप युतीत गोंधळ पाहायला मिळाला. शिंदे गटाचे नाना भानगिरे यांनी सकाळी युती तुटल्याचे जाहीर केले. शिवसेनेकडून 165 जागांवरील उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात आले. परंतु, विजय शिवतारे यांनी युती अजूनही चर्चेत असल्याचे सांगितले. दरम्यान, अजित पवार यांनी काही वादग्रस्त उमेदवारांना उमेदवारी दिली, ज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली गजा मारणे यांची पत्नी आणि आयुष कोमकर हत्याप्रकरणातील सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश आहे. पुण्यात युती न झाल्यामुळे भाजप विरुद्ध -शिंदे सेना तर अजित पवार गट -विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट आणि यांच्या विरोधात महाविकास आघाडी अशा बहुरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. म्हणजे एकंदरीत सर्व पक्ष एकमकंसमोर लढत आहेत असे चित्र आहे. परतू काही भागात युती देखील झाली आहे . त्यामुळे या वर्षीचे राजकीय चित्र संभ्रमात टाकणारे आहे.
ठाण्यात शेवटच्या दिवशी उमेदवारांची तारेवरची कसरत
ठाणे महानगरपालिकेत शेवटच्या दिवशी उमेदवारांनी प्रचंड धावपळ केली. एकनाथ शिंदे यांच्या गटाने रात्रीच बहुतेक उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. तर मनसे, ठाकरे गट आणि भाजपचे उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करताना दिसले. ठाण्यात मनसे, ठाकरे गट, शरद पवार गट एकत्र लढत आहेत. शिंदे गट आणि भाजप एकत्र लढत आहेत, तर अजित पवार गट आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहेत. एकंटारीत संपूर्ण महाराष्ट्रात युतीचा सांवळागोंधळ चालू असताना नक्की सत्ता कोणाच्या परड्यात पडणार हा प्रश्न संपूर्ण जनते समोर उभा राहिला आहे.



















