Homeताज्या बातम्याLiquor Seized in Pune : पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई...

Liquor Seized in Pune : पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई परराज्य मद्य जप्त, दोन आरोपी अटकेत 94 स्कॉच व वाईनच्या बाटल्या जप्त, दोन जण अटकेत

पुणे | २४ डिसेंबर २०२५ : पुणे शहरातील कॅम्प परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत परराज्य स्कॉच, वाईन व इतर मद्याचा साठा जप्त केला आहे. बाबाजान चौक, कॅम्प, पुणे येथे करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण 94 बाटल्या (32 ब्रँड्स) जप्त करण्यात आल्या असून, ₹ 8,00,699 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कारवाई निरीक्षक, ‘ए’ विभाग, पुणे यांच्याकडून करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा (MPA) कलम 65, 80, 81, 83 व 108 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान परराज्य मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन (एर्टिगा) तसेच 3 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात राजेश बसंतानी व प्रकाश बसंतानी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पुणे व मा. उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास अधिकारी म्हणून व्ही. एस. कौसडीकर (निरीक्षक), देवदत्त पोटे (निरीक्षक), आर. एस. माने (दुय्यम निरीक्षक), हितेश पवार, विजय सूर्यवंशी, किरण पाटील, दिनेश सूर्यवंशी (सर्व दुय्यम निरीक्षक) यांनी सहभाग घेतला.

या कारवाईत पूजा किरतकुडवे, श्रीधर टाकळकर, अमोल यादव, अक्षय म्हेत्रे, जानवी शेडगे व समीर पडवळ या कर्मचाऱ्यांनी मोलाची मदत केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परराज्य मद्याच्या बेकायदेशीर विक्री व वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!