Homeताज्या बातम्यापुणे कोथरूड, हडपसरच्या जागेवरून ताणेबाणे; 'मविआ' च्या बैठकीला उद्धव ठाकरे गट गैरहजर...

पुणे कोथरूड, हडपसरच्या जागेवरून ताणेबाणे; ‘मविआ’ च्या बैठकीला उद्धव ठाकरे गट गैरहजर…

पुणे : काँग्रेस भवनमध्ये शनिवारी दुपारी महाविकास आघाडीची निवडणूक पूर्व संयुक्त बैठक पार पडली. यात शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहिले नसल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईत बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले.

हडपसर, तसेच कोथरूड या दोन जागांवरून महाविकास आघाडीतीलकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात मतभेद झाल्याचे सूत्रांकडून कळते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर,  तसेच दोन्ही पक्षांचे शहरातील इच्छुक, त्यांचे समर्थक कार्यकर्ते व संघटनात्मक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना शहराध्यक्ष, जिल्हाप्रमुख यांची बैठक बोलावली आहे, त्यामुळे शहरातील संजय मोरे व गजानन थरकुडे हे त्या बैठकीसाठी मुंबईत गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याशिवाय शिवसेनेचे अन्य कोणी पदाधिकारीही बैठकीला हजर नव्हते. त्याची चर्चा सुरू झाल्यावर अन्य पदाधिकाऱ्यांकडून ही माहिती बैठकीतील उपस्थितांना देण्यात आली.

राज्य सरकारच्या विरोधात जनमत आहे. ते मतदानामध्ये परावर्तित करायचे असेल, तर महाविकास आघाडी एकसंघपणे काम करताना दिसायला हवी. मतभेद, एकमेकांबद्दलचा राग विसरायला हवा. तसे झाले, तर यश मिळेल, असे मत बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले. उमेदवार तुमचा-आमचा असे केले तर तोटा होईल. ज्या मतदारसंघात काम करता तिथेच राहून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काम करायचे, शेजारच्या मतदारसंघात आमच्या पक्षाचा उमेदवार आहे, तिथे जाऊन काम केले तर त्याचा परिणाम मतांवर होतो. त्यामुळे असे करणे टाळावे, असा सल्लाही या नेत्यांनी दिला.

कोथरूड शिवसेनेला, तर हडपसर राष्ट्रवादीला ?

शिवसेनेने हडपसर व कोथरूड या दाेन जागांचा आग्रह महाविकास आघाडीत धरला आहे. यातील हडपसरच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आग्रही आहे, तर कोथरूडची जागा काँग्रेसला हवी आहे. यामध्ये कोथरूडची जागा शिवसेनेला देऊन हडपसरची जागा राष्ट्रवादीला ठेवावी, अशी तडजोड करण्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

error: Content is protected !!