Homeक्राईमवरोरा मधे बनावट देशी मद्य वाहतूक करताना कारवाई स्कॉर्पिओ वाहनासह १२.१९...

वरोरा मधे बनावट देशी मद्य वाहतूक करताना कारवाई स्कॉर्पिओ वाहनासह १२.१९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

वरोरा (आशिष कोटकर, वरोरा प्रतिनिधी) :  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धाडसी कारवाई करत बोर्डा चौक परिसरात अवैधरित्या बनावट देशी मद्याची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर सापळा रचून कारवाई करत अंदाजे १२ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई महाराष्ट्र स्टेट  एक्साईज  डिपार्टमेंटच्या वरोरा पथकाने केली. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास बोर्डा ते राधा मिलन मंगलकार्यालय रोडवरून बनावट देशी मद्याचा साठा घेऊन एक वाहन येणार असल्याची सूत्राकडून गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार सापळा रचून तपासणी करण्यात आली असता तपासणीदरम्यान एमएच-३४-सीडी-३३३६ क्रमांकाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार थांबवून तपासली असता वाहनात रॉकेट देशी दारू संत्रा कंपनी या नावाचे १०० मिली क्षमतेचे ५० बॉक्स (एकूण सुमारे ५००० बाटल्या) असा बनावट देशी मद्यसाठा आढळून आला.

या प्रकरणात आशीष रमेश मीटपल्लीवार (वय २३, रा. बोर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून सुमारे २ लाख रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा व स्कॉर्पिओ वाहन असे एकूण अंदाजे १२ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ तसेच संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विनय गौडा, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त गणेश पाटील तसेच अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पथकाने ही कारवाई केली.

कारवाईत निरीक्षक प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, सागर दिडसे, प्रमोद रजोते, हर्षराज इंगळे तसेच जवान विलास महाकुलकर (वाहन चालक) यांच्यासह जवान जितेंद्र आनंद, जगदीश मस्के, मंगेश कुयटे, अमोल भोयर, किशोर पेदुजवार आणि शुभम गोवरदीपे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!