Homeक्राईमJalindar Supekar: 500 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप; अमरावती कारागृहातील गायकवाड प्रकरण काय?,...

Jalindar Supekar: 500 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप; अमरावती कारागृहातील गायकवाड प्रकरण काय?, सुपेकर यांची बाजू काय ?

अमरावती : पुण्यातील सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गायकवाड बाप-लेकाच्या वकीलांनी अमरावती कारागृहाचे तत्कालीन उपमहानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर ५०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाने पुण्यातील राजकीय आणि पोलिसी वर्तुळात खळबळ उडवली असून, याप्रकरणी चौकशीची मागणी जोर धरत आहे.

गायकवाड प्रकरण काय ?

नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांना २०२१ मध्ये गणेशच्या पत्नीवर हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली अटक झाली. गणेशचं लग्न २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत गेलेल्या दिपक साळुंखे यांच्या मुलीसोबत झालं होतं. मात्र, लग्नानंतर हुंड्यासाठी पत्नीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. याशिवाय, नानासाहेब यांच्यावर सावकारीविरोधातील अनेक तक्रारींमुळे मकोका कायद्यांतर्गत कारवाई झाली. येरवडा कारागृहात हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांना अमरावती कारागृहात हलवण्यात आलं.

सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप

गायकवाड यांच्या वकिलांनी, निवृत्ती कराड यांनी, न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा केला आहे की, १९ ऑगस्ट २०२३ रोजी अमरावती कारागृहात पाहणीसाठी आलेले तत्कालीन उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी गायकवाड यांना जामिनासाठी ५०० कोटी रुपये मागितले. याचिकेत असा आरोप आहे की, सुपेकर यांनी गायकवाड यांना धमकावलं आणि सांगितलं की, “तू मला ५०० कोटी दे, फिर्यादी माझ्या ओळखीचे आहेत, मी तुला बाहेर काढतो.” याशिवाय, सुपेकर यांनी इतर कैद्यांना धमकावल्याचा आणि वैद्यकीय तपासणी टाळल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

पोलिस आयुक्तांवरही प्रश्नचिन्ह

या प्रकरणात माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. गायकवाड यांच्या वकिलांनी दावा केला आहे की, गुप्ता यांनी गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करताना विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं आणि त्यांच्या लॉकरमधून १०० कोटी रुपये आणि सोन्याचे दागिने जप्त केले. याशिवाय, गायकवाड तुरुंगात असतानाही त्यांच्या नावाने बनावट स्टॅम्प तयार केल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणात गुप्ता आणि सुपेकर यांच्या चौकशीची मागणी वकिलांनी केली आहे.

सुपेकर यांचे मेहुणे आणि खडक पोलिस स्टेशन

या प्रकरणाला आणखी एक वळण मिळालं आहे, कारण सुपेकर यांचे मेहुणे, पुण्यातील खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण, यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. चव्हाण यांच्यावर नारायणगाव येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा, मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांना पदोन्नती कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागे सुपेकर यांचा हात असल्याचा संशय वकिलांनी व्यक्त केला आहे.

जालिंदर सुपेकर यांची बाजू

डॉ. जालिंदर सुपेकर यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. त्यांनी सांगितलं की, कारागृह उपमहानिरीक्षक म्हणून त्यांनी १९ ऑगस्ट २०२३ रोजी अमरावती कारागृहाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी कारागृहाची सुरक्षा, स्वच्छता आणि बराकींची पाहणी केली. “कोणत्याही कैद्याशी बोलणं संवैधानिक नाही. माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आणि बदनामीसाठी आहेत,” असं सुपेकर यांनी स्पष्ट केलं. तसेच, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबतही त्यांनी नियमांचा आधार घेत सर्व आरोप फेटाळले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनची दमदार सुरुवात; क्रीडा क्षेत्रात नवी दिशा देण्याचा निर्धार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  लेवा समाजातील क्रीडा चळवळीला नवे बळ देणाऱ्या लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनच्या भव्य उद्घाटन सोहळ्याने उत्साहाचा उच्चांक गाठला. अत्यंत जल्लोषात पार...

अटलांटा प्रकरणात महापालिकेला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : विमानतळ विकासाशी संबंधित अटलांटा कंपनी प्रकरणात जळगाव महापालिकेला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालय यांनी महापालिकेची याचिका फेटाळून...

ब्रह्मपुरी हादरली! शस्त्रक्रियेनंतर तिघांना कायमचे अंधत्व; हॉस्पिटलचा परवानाच गुल.

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : वैद्यकीय क्षेत्राला देवदूताचा दर्जा दिला जातो आणि 'रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' मानली जाते. मात्र, ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये या तत्त्वाला...

भाजपचा निष्ठावंत चेहरा डॉ. अशोक ओळंबे शिंदे गटात; समीकरणे बदलणार?

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : भाजपला अकोल्यात मोठा धक्का RSS स्वयंसेवक डॉ. अशोक ओळंबे यांचा शिंदे गटात प्रवेश. सविस्तर वृत्त अकोला : अकोला जिल्ह्यात...

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

error: Content is protected !!