Homeताज्या बातम्यातबलीगी जमातवरील खोट्या गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता: सत्य आणि न्यायाचा विजय

तबलीगी जमातवरील खोट्या गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता: सत्य आणि न्यायाचा विजय

पुणे :- 2020 साली कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, देशभरात तबलीगी जमात आणि दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ केंद्रात आयोजित धार्मिक कार्यक्रमावर एकतर्फी आणि द्वेषपूर्ण पद्धतीने माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्या प्रसारित केल्या. “कोरोना बॉम्ब,” “कोरोना रफ्तार का जमाती ड्रायव्हर,” आणि “कोरोना के नाम पर जिहाद” यांसारख्या मथळ्यांनी समाजात भय आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न झाला.

एका अभ्यासानुसार, २० मार्च ते २७ एप्रिल २०२० दरम्यान तबलीगी जमातविरोधात देशातील २७१ मीडिया प्लॅटफॉर्मवर तब्बल ११,०७४ बातम्या प्रसिद्ध झाल्या. २ एप्रिल रोजी केवळ एका दिवसात १४९१ बातम्यांद्वारे मुस्लिम समुदायाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे वृत्तांकन केवळ अप्रामाणिकच नव्हे, तर समाजात धार्मिक तेढ वाढवणारे आणि सांप्रदायिक सलोख्याला धक्का देणारे होते.

या अपप्रचारावर आधारित पोलिस कारवाईत, कोणताही ठोस पुरावा नसतानाही अनेक मुस्लिम व्यक्तींवर कोरोना प्रसाराचा आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आले. हे सर्व एक पूर्वनियोजित षड्यंत्र होते, ज्याद्वारे तबलीगी जमातला आणि मुस्लिम समाजाला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला.

मात्र, अलीकडेच विविध न्यायालयांनी या खटल्यांवर निकाल देताना स्पष्ट म्हटले आहे की हे सर्व आरोप निराधार, तथ्यहीन आणि द्वेषभावनेतून प्रेरित होते. देशभरात तबलीगी जमातशी संबंधित जवळपास ७० जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे न्यायालयाने फेटाळून लावले असून, संबंधित सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

या निकालाने केवळ तबलीगी जमातच्या सदस्यांना न्याय मिळवून दिला नाही, तर भारतीय न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेवरही शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर पत्रकारितेची जबाबदारी अधोरेखित करत, माध्यमांनी वस्तुनिष्ठ आणि सत्य घटनांवर आधारित वार्तांकन करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ही घटना आपल्याला स्मरण करून देते की – सत्य कितीही दबले गेले तरी ते पुन्हा उभे राहते. माध्यमांनी समाजात दुही पसरवण्याऐवजी एकोपा, सहिष्णुता आणि न्याय या लोकशाही मूल्यांचे पालन करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाणी चोरांचे धाबे दणाणले! मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांच्या आदेशाने ब्रह्मपुरीत धडक मोहीम

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शेजाऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या पाणी चोरांना ब्रह्मपुरी नगरपरिषदेने जोरदार झटका दिला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे आधीच...

कांद्याला कवडीमोल दर; १८ मे रोजी लासलगाव मार्केटमध्ये रोहित पवारांचे आंदोलन

0
निफाड | प्रतिनिधी : उत्तम जाधव :- लासलगाव बाजार समितीत कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, या पार्श्वभूमीवर आमदार Rohit...

उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे मोफत सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
शिरवाडे वाकद (प्रतिनिधी योगेश कर्डिले): जिल्हा रुग्णालय नाशिक येथील कार्यरत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी व डॉ. बाळू...

कर्मवीर क्रिकेट क्लबच्या आदिवासी कन्येची दमदार झेप…

0
कुमारी अश्विनी कृष्णा पावरा धुळे जिल्हा अंडर-15 मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी नियुक्त शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :- किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर क्रिकेट क्लब शिरपूरच्या आदिवासी...

जळगाव जिल्ह्यात १८ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू…

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : सध्या देशातील आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच आगामी सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने...

error: Content is protected !!