Homeताज्या बातम्याBharat Taxi Seva: सहकार से समृद्धी’कडे वाटचाल : १ जानेवारीपासून ओला ,...

Bharat Taxi Seva: सहकार से समृद्धी’कडे वाटचाल : १ जानेवारीपासून ओला , उबेर ला पर्याय ‘भारत टॅक्सी’ सेवा

Times of Maharashtra Desk: ओला आणि उबर यांसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय म्हणून केंद्र सरकारच्या पाठबळावर ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) ही नवी, सहकारी तत्त्वावर आधारित टॅक्सी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर ही सेवा दिल्लीमध्ये १ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. या उपक्रमामुळे खासगी कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या जादा कमिशनला आळा बसेल आणि चालक तसेच प्रवासी-दोघांनाही थेट फायदा होईल, असा दावा करण्यात येत आहे.

भारत टॅक्सी हे सहकारी मॉडेलवर आधारित असल्याने चालक हे केवळ कर्मचारी नसून सेवेचे भागीदार व मालक असतील. कंपनीकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नसल्यामुळे चालकांना त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा मिळणार आहे. त्यामुळे चालकांचे आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होणार आहे.

प्रवाशांसाठी स्वस्त व पारदर्शक भाडे
या सेवेमध्ये ‘सर्ज प्राइसिंग’ असणार नाही. म्हणजेच गर्दीच्या वेळी भाडे अचानक वाढणार नाही. भाडे निश्चित, पारदर्शक आणि तुलनेने स्वस्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याने प्रवाशांना वाढीव दरांचा फटका बसणार नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ग्राहक सेवा आणि थेट सुरक्षा यांना प्राथमिकता देण्यात आली आहे . डीजीलॉकर, उमंग यांसारख्या सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्म्सशी जोडलेले असेल.

सध्याच्या सेवांमधील अडचणींवर उपाय
सध्याच्या टॅक्सी सेवांमध्ये चालकांना जादा कमिशन, कमी उत्पन्न आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव जाणवतो. तर प्रवाशांना वाढलेले दर, राइड रद्द होणे आणि सेवेच्या गुणवत्तेबाबत तक्रारींचा सामना करावा लागतो. ‘भारत टॅक्सी’ या सर्व समस्या कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

सहकार से समृद्धी या ध्येयाशी सुसंगतपणे चालकांना सक्षम करणे, त्यांना योग्य व स्थिर उत्पन्न मिळवून देणे आणि प्रवाशांना स्वस्त, सुरक्षित व विश्वासार्ह वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
भारतामधील अनेक दशलक्षी शहरे, वेगाने विस्तारत असलेले आयटी हब, तसेच राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमुळे वाढत चाललेली कामगारांची संख्या लक्षात घेता, सरकारकडून स्वतःची अशी एक विश्वासार्ह टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे. याचा लाभ येत्या काळात चालक, प्रवासी आणि शहरी वाहतूक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!