Times of Maharashtra desk: बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमी त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याच्या आयुष्यातील अनेक नात्यांमुळे सलमान नेहमी गोत्यात येताना दिसतो. आता पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे. सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमी अली ही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड. हिने सलमान खानच्या विरोधात आरोप करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या या व्हिडिओची चर्चा सलमान खानच्या चाहत्यामध्ये होताना दिसत आहे.
नक्की सोमीचा आरोप काय?
सोमी अलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात तिने सलमान खानवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे . या व्हिडिओमध्ये बोलताना सोमीने “सलमान खान, माझ्या आयुष्यातून गेल्यानंतरही, मला एकटं सोडत नाहीये. तो 2025 मध्येही मला धमकावत आहे. माझा एक्स बॉयफ्रेंड सलमानने मला एका अनोळखी नंबरवरून फोन केला आणि म्हणाला, ‘जर तू माझ्याविरुद्ध काही बोललास तर तर त्याचे परिणाम गंभीर होतील आणि तो तसं वागलाही. त्याने मला बॉलिवूडमधून बॉयकॉट केलं. बॉलिवूडमधलं कोणीच माझ्याशी बोलत नाही, माझे मित्रही माझ्यापासून दूर पळतात” असा आरोप सोमीने केला आहे.
सोमी इतकाच बोलून थांबली नाही तर तिने पुढे “सलमान ने टीआरपी, त्याचे रेटिंग्स आणि त्याचं सगळं काही गमावलं आहे. मी सलमान सोबत ब्रेकअप केलं, कारण 1998 मध्ये त्याने माझी फसवणूक केली. पण , आता 2025 मध्येही तो दुबईला जाऊन माझ्या कुटुंबियांना भेटतो, तो हे सगळं मुद्दाम करत आहे. त्याला माझा काळजी आहे म्हणून तो हे करत नाही, तर त्याला मला दुखवायची इच्छा आहे” असे आरोप करत सोमी ने सलमान विरोधात एक पोस्ट वायरल केली आहे. या पोस्टमुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.






















